लेखणी माझी देखणी
लेखणी माझी देखणी
1 min
198
लेखणी देखणी
खूपच लाडकी
मनीच्या भावना
त्वरित पोचवी (१)
सुचेलसे वाटे
हातात लगेच
झरझर भाव
पानावर थेट (२)
भाव भावनांचे
आवर्तन पूर्ण
मग थबकते
सुधारणा पूर्ण (३)
निसर्ग बालके
बदके बघता
काव्यबद्ध करी
लेखणी त्वरिता (४)
लेख नि निबंध
व्यक्तिचित्रे रेखी
कथा , लघुकथा
अलके रेखाटी (५)
स्फूर्तीची देवता
चैतन्याची खाण
शब्दांचे वैभव
नाही कधी वाण (६)
नमिते तिजला
नित्य मनोमनी
लेखनाची उर्जा
जन्मजन्मांतरी (७)
