लेक लाडकी...
लेक लाडकी...


लेक झाली पाहुनी
कंठ दाटून आला चालली लेक लाडकी..
लेक माझी झाली पाहुणी माझ्या घरची..।
जन्म दिला, केलं मोठे, केले किती लाड
जीव माझा, प्राण माझा काळजाचा घड
चालली सासरी भरली माझ्या काळजात धडकी...
कंठ दाटून आला चालली लेक लाडकी...
आई-बापाचं घर आज चालली सोडून
किती आवरु मनाला रडून रडून
निरोप घेऊन चालेल वाट सासरची...
लेक लाडकी।।
दुःख होई लेकीला मी निरोप कसा देऊ
डोळ्यात गंगा-यमुना
कसे पुसून डोळे घेऊ
सासुरवाशिण झाली माझी लेक लाडकी...।
भाग्यश्रीचं भाग्य मोठे
लाभले माता-पिता महान
सर्व सुखं पायी तिच्या
मिळाला जीवनसाथी छान
व्हावे सर्व सार्थक जीवनाचे
आम्हा वाटावा अभिमान
अपेक्षा पूर्ण होवो मनीच्या
मिळो जगी मानसन्मान जगी
आनंदी आनंद होई सकला
आज सोनियाचा दिन
करु शुभेच्छांचा वर्षाव
बोलून शुभमंगल, सावधान...