Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

लावण्यवती

लावण्यवती

1 min
11.6K


तुला पाहताच एक वेगळी अनुभूती येते, 

तुझ्यामुळे माझे मन मोहून जाते |

वर्णन करायला शब्द अपुरे पडत आहे, 

नुसतं तुला पाहत राहावेसे वाटत आहे ||


तुला पाहून शेकडो चंद्र फिके झाले, 

रात्र धुंद झाली अन् तारे फुलून गेले |

तुला पाहताच बागेत गुलाब फुलले, 

तू जवळून गेली तेव्हा मन मोहून गेले ||


तुझी अनाकलनिय कलाकृती दृश्य झाली, 

अशीच एक गोष्ट मनाला मोहून गेली |

चेहरा निरागस, डोळे कमलिनी, 

निरोगी शरीरयष्टी छाप सोडून गेली ||


लांबसडक केस तुझे, सुरईदार मान तुझी, 

डोळ्याचे पारणे फेडणारी, धारदार नजर तुझी |

गोलाकार मनगटे, लांब लांब बोटे तुझी, 

सुडोल मांडी तुझी, उंच उंच लांबी तुझी ||


शरीर कमनीय तुझे, हिरणी सी चपळ तू, 

हास्य मनाचे आहे, लाजण्याचे शृंगार तू |

चेहऱ्यावर लाली तुझी, तितकीच मोहक तू, 

खजिना लाभला निसर्गाचा, अशी सौंदर्यवती तू ||


आहेत ओठ तुझे, गुलाबाच्या पाकळ्या 

निसर्गाने दिलं आहे, त्या उमलत्या कळ्या ||

सोज्वळ मनाला आकर्षित व्यक्तित्व, 

हासऱ्या चेहऱ्यावरची, खुलवते व्यक्तीमत्व ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance