STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

लावण्यवती

लावण्यवती

1 min
350

मातीचा देहाला शृंगार,

डोईवरी कष्टाचा भार,

नजरेत बरची कट्यार,

हास्यात बिजलीची धार।।१।।


रुपगर्विता चतुर सुकुमारा,

मोतीया दंतपंक्तीचा तोरा,

मिरविते अभिमानाने सारा,

कौतुकाने पाहते धरा।।२।।


लावण्यवती ती आरस्पानी,

पाहता लोचने भूलली,

काळ्या रंगाला दुषिती ती,

सारी जग दुनिया पस्तावली।।३।।


लोलके झुलती कानी,

बटा मिरवती भाळी,

नाकी मातीची चमकी,

मृदा ठुशी शोभे गळी।।४।।


मर्दानी रांगड्या देहाला,

घामाच्या सुटल्या धारा

जणू पाझर देहा फुटला,

झाकण्या तनू मृदेच्या पहारा।।५।।


ना तिज कसला सोस,

ना सौंदर्याचा करी हव्यास,

ना करी दुःखाचा आक्रोश

आनंदी जगण्याची आस।।६।।


परी कराल विचार वाकडा,

नागिणीचा काढील फडा,

विंचवाचा डंख तो सोडा,

जीव जाईल फडफडा।।७।।


Rate this content
Log in