लावणी
लावणी
1 min
1.2K
जाऊन बुलडाण्याच्या बाजारी
आणा शालु एक हिरवा
राया माझ्याशी एकदा बोला
इकडे मान तुमची जरा फिरवा||धृ||
डोक्यावर ऊन सारं तापलं
अंग घामानं सारं भिजलं
जीव माझा घाबरून गेला
येऊन तुम्ही इकडे पंखा चालवा||
इकडे मान तुमची जरा फिरवा||
अहो राया, इकडे मान तुमची फिरवा||1||
असा का फुगला तुमचा चेहरा
उगाच का दावता हा नखरा
उघडून ती खिडकी काळजाची
येऊ द्या तुमच्या प्रेमाचा गारवा ||
इकडे मान तुमची जरा फिरवा
सख्या, इकडे मान तुमची जरा फिरवा||2||
जाऊ दोघं गाडी बैलानं
खरेदी करू सारं दुकान
हौस आता माझ्या जीवाची
एकदाच आज तुम्ही पुरवा||
इकडे मान तुमची जरा फिरवा
राया इकडे मान तुमची जरा फिरवा||3||
