Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Nimbalkar

Romance

3  

Pandit Nimbalkar

Romance

लाईफ कट्टा

लाईफ कट्टा

1 min
47


बदनाम झाला जरी 

मला हवासा वाटतं होता 

काॅलेज कट्टा उनाड तो 

माझा लाईफ कट्टा होता ||धृ||


राडा, मस्ती,जिगरबाज दोस्ती 

हल्ला, कल्ला,धमाल नुस्ती 

परीक्षेची मात्र नेहमीच धास्ती 

तोच सार सेट करत होता ||१|| 


तारूण्याचा बहर आल्यावर 

पहिलं पाऊल प्रेमात पडल्यावर 

कुणी आपली कळ काढल्यावर

सावरायला धावून येतं होता ||२||


कैकांची लाईफ तिथेच सेट झाली 

असंख्यांची बरबाद ही केली 

पण सर्वांना जगण्याची मजा आली 

त्याचा साक्षीदार एकटा तोच होता ||३||


किती लहरी आल्या गेल्या 

मैफली बेभान कितीक रंगल्या 

मधूर आठवणी त्याने दिल्या 

आजही मी त्यालाच मिस करतो ||४||


Rate this content
Log in