Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Nimbalkar

Others

3  

Pandit Nimbalkar

Others

बहीण पाठीराखी

बहीण पाठीराखी

1 min
165


सर्वांत मोठी बहिण भारती 

तिच्या पाटची मिना नाव तिचे 

मधला लाडोबा मीच बरं का 

ज्योती, छाया नाव शेवटचीचे ||१||


उसतोडीला जायच्या मोठ्या दोघी

शाळा सातवीत सुटली कायमची 

आम्ही तिघे होतो आजीसोबत गावी 

लहानी स्वयंपाकात मदत करायची ||२||


भाऊ लाडका होता त्या चौघींचा 

खाऊची वाटणी होती माझ्याकडे

खेळणी घे पण शाळा शिक म्हणायच्या 

दुखल्यावर घालायच्या देवाला साकडे ||३||


बापाचा आधार दैवाने अर्ध्यात नेला

आईला हातभार बहीणींनी दिला

माझ्या शाळेचा खर्च मजुरीत केला

लग्नासाठी होती पुण्याई गाठीला ||४||


हट्ट नाही राखीला, ना भाऊबीजेला

सुख लाभू दे म्हणतात भाऊ तुला 

माझं हे अस्तित्व आहे त्यांच्यामुळे 

या चौघी बहीणीच पाठीराख्या मला ||५||


Rate this content
Log in