वारी यंदाची चुकली
वारी यंदाची चुकली
1 min
163
धाव घेई पांडुरंगा
भक्ती अंतरी कोंडली
साथ कोरोनाची येता
वारी यंदाची चुकली ||धृ||
ओढ तुझी पांडुरंगा
माझ्या मनाला लागली
आली बघा एकादशी
पायी दिंडी ती निघाली ||१||
हरी नामाचा गजर
टाळ, मृदंगी चालला
अश्व, झेंडे, वीणा, माळ
टिळा कपाळी लावला ||२||
डोई तुळशी घेऊन
मुखी भजन म्हणते
मागे सोडून संसार
विठ्ठू भक्तीत दंगते ||३||
भेट होता ज्ञान तुका
थांबे पालखी दर्शना
गाता अभंग संतांचे
देव नाचतो किर्तना ||४||
मुकी झाले रे पंढरी
चंद्रभागा ही रूसली
दुर रुख्मिणी ती उभी
तुझी माया का? आटली ||५||