STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*लाभार्थी*

*लाभार्थी*

1 min
14.5K




जन्म दिला मातेने

पालन केले पित्याने

काळजी घेतली कुटुंबाने

*लाभार्थी मी या जीवनाचा*


ज्ञानमंदिरी गेलो

अध्ययन केले

उपक्रम,प्रकल्प केले

*लाभार्थी मी या जीवनाचा*


बोहल्यावर चढलो

विवाह बंधनात अडकलो

संसारात रममाण झालो

*लाभार्थी मी या जीवनाचा*


संसार वेलीवर

दोन फुले उमलली

आमची अंतरे आनंदली

*लाभार्थी मी या जीवनाचा*


मुले मोठी झाली

उत्तम शिकली,सवरली

परदेशात गेली

*लाभार्थी मी या जीवनाचा*


मुलांकडे नजर लागली

ती परदेशात स्थित झाली

आमची मने सावरली

*लाभार्थी मी या जीवनाचा*


एक दिवस असा येईन

मी भुर्रकन उडून जाईन

स्वप्ने इथेच ठेवून

*लाभार्थी मी या जीवनाचा*




Rate this content
Log in