कवितेची वही
कवितेची वही
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
257
काल मी सहज म्हणून ,
चाळली जुनी कवितेची वही
पाना पानावर तुझीच प्रतिमा
शब्दातून उमटली, प्रेमाची ग्वाही ||१||
हात फिरवताना भास क्षणिक
मनाला हळवं करून गेला
दुरावलेल्या सुगंधी प्रेमाला
डोळ्यातून पुन्हा ओघळुन गेला ||२||
होत्या काही कविता प्रेमाच्या
काही नाजूक गुलाबी मोहाच्या
नाटकी काही, काही लाडाच्या
नंतरच्या होत्या काही विरहाच्या ||३||
ती कवितेची वही साक्ष नात्याची
मी अजूनही जपून ठेवली आहे
तुझी आठवण आल्यावर
पुन्हा पुन्हा मी वाचली आहे ||४||