STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

2  

Arun V Deshpande

Others

कवितेचे येणे असेच असावे!

कवितेचे येणे असेच असावे!

1 min
14.1K


मनास आतून भरते यावे

काय सांगू किती सांगू असे व्हावे

आवेग भावनांचे कल्लाेळ ऊठावे

कवितेचे येणे असेच असावे।।

त्याने लिहिले मग मी का रहावे?

हट्टसी एैशा कधीही न पेटावे

शब्दांचे दळण कधी न दळावे

कवितेचे येणे कधी असे नसावे।।

माणसांशी भवतालीच्या आपले

भावनिक असे ते नाते असावे

शब्दांशी असेच घट्ट मैत्र असावे

यातूनच कवितेचे येणे असावे.।।

----------------------------------------------


Rate this content
Log in