STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

2  

Arun V Deshpande

Others

कविता - वाईट नसते वाटले

कविता - वाईट नसते वाटले

1 min
2.7K


फाटका म्हणून कुणी हसले 

इतके वाईट नसते वाटले 

वाईट याचे जास्त वाटले की 

स्वार्थामुळे नाते पुरते फाटले …!

रंग वरवरचे पाहून भुललो 

ओळखण्यातही कमी पडलो 

गमावून बसलो नि लक्षात आले 

मायेचे झरे तेही आता आटले…!

वाहती वारे भोवताली तैसे 

भिरभिरणे कधी नाही जमले 

शब्द माझेच जे बोलून बसलो 

फिरवणे शब्दांना नाही जमले …!


Rate this content
Log in