कविता : जीवन वाट २२/५/२०२०
कविता : जीवन वाट २२/५/२०२०


ही वाट जातसे कुठे? थांग न लागे तिचा
असाच असतो मार्ग दिगंतर जीवा जीवनाचा !
ही वाट एवढी रुंद मोकळी क्षितिजापर्यत असे पोचली
पायी हवे बल, आणि पाहिजे वेग चालण्याचा (१).
दिसती न येथे खाचा खळगे भिरभिर वारा अंगा बिलगे
दिसे न कोठे एक झाडही, तुकडा न सावलीचा (२).
तरीही पायी ऋतेल काटा गवत फुलांचा सुगंध येता.
निळे निळे आकाश घेतसे शोध अनंताचा (३).
अशाच वाटा जीवनातही तुडवीत जाणे असे प्रत्यही
जन्मापासून प्रवास होतो सुरू माणसाचा (४).
कधी वाट ही वाट दाविते कधी परंतु वाट लाविते
आनंदाने चाल चालणे ना कण्हता रडता (५).
कुठवर जाणे ते नच ठावे समोर बघुनी चालत जावे
ध्येय मंदिरी पोचून लावू दीप पूर्णतेचा (६).
ही वाट जाते किती दूर दूर दूर संगीत जीवनाचे सापडेल सूर
लावील मज छंद वाट, स्वप्नात जगण्याचा (७).