कविता - दमछाक झाली सारी
कविता - दमछाक झाली सारी
1 min
27.3K
रस्ते होते चकवे फसवे
सारे भुलवे समजे आता ।।
सांगणे सारे ते शब्दांतले
अर्थ फसवे उमजे आता ।।
होती माणसे गर्दीच सारी
यातले आपले नाही आता ।।
व्यर्थ केली धावाधाव सारी
श्रमल्यावरी कळले आता ।।
दमछाक झाली केवढी ही
होते मृगजळ कळे आता ।।
