कविता असते मनामनात
कविता असते मनामनात
1 min
27.3K
कविता असते मनामनात
कविता वसते जनाजनात
कविता दिसते पुस्तकाच्या पानापानात,
कवींच्या ओघवत्या लेखणीतून
कविता अशी नटुन थटून तर येतेच
आणि गुणगुणते आपल्या कानात
कवितेचे आपल्याशी बोलणे,
कवितेने असे शब्दांना तोलणे,
कवितेतच असते एखादे गाणे,
कवितेलाच जमते असे मोहरणे
आणि वसंत ऋतुसारखे बहरणे
कविता माणसांच्या दु:खांनी रडते
तर कधी अनिवार सुखाने बागडते
अशा या रंगतदार कवितांमधून
आपल्या जगण्याची रंगत वाढते
पण कधी कधी कविता रुसते
कारण कविता कधीच नसते
कुणाच्या तालावर नाचणारी
ती तर आपल्या शब्दांना बांधील असते
ज्यामध्ये या जगाची व्यथा नि कथा
अगदी आपसुकच लिहिली जात असते
