कवडसा
कवडसा

1 min

515
तिरीप उन्हाची शोधत येते
हळूच कौलारांतून जागा
कवडसा किरणांचा दाखवतो
काळ्या अंधाराला ठेंगा...!
तिरकस रेषेमधून उभ्या
दिसतात प्रकाशाचे डोळे
काळोखाला दूर लोटण्यास
दक्ष राहतात उजेडाचे गोळे..!
कोवळ्या उन्हाचा संपताच डाव
रविकिरणांचा सुरु होतो खेळ
उष्ण लाटा प्रसवतात हळुवार
ऊन सावलीचा लुप्त पावतो मेळ..!
जीवनातही असेच घडते नेहमी
दुःखांमधून थोडे सुख डोकावते
आनंद सौख्याचा लाभतो क्षणभर
पण, त्यानेही मन प्रफुल्लित होते...!