STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

3  

Sheshrao Yelekar

Others

कुठे शोधू देव

कुठे शोधू देव

1 min
14K


तुझे होई भास! कुठे शोधू देव!!

नाही येत केव! आम्हावर!!१!!


डोहाळे लागले! मन हे वेधले!!

पाय गा झिजले! किर्तनात!!२!!


टाळ मृदंगाचा! गजर गूंजतो!!

तिथं मन जातो! दर्शनास!!३!!


कानी पडे नाव! तिथ मोह खास !!

जागे मनी आस! देवावर!!४!!


दगळ विटात शोध! माझा देवा!!

भेटीसाठी हेवा! पांडुरंगा!!५!!


गुण तुझे गातो! नाम हे भजतो!!

भजनी रमतो! भावपूर्ण!!६!!


तुझे नाम ओठी! भजतो तुझसी!!

भेद का मजसी! कृपावंता!!७!!


कुठे पाहू तुला! कुठे शोधू तुला!!

भेट दे रे मला! माझ्या देवा!!८!!


तुटे आता धीर! दर्शन दे मज!!

ठेव माझी लाज! दयावंता!!९!!


Rate this content
Log in