STORYMIRROR

Sunjay Dobade

Others

0.7  

Sunjay Dobade

Others

कुत्र

कुत्र

1 min
14.5K


अरुंद गल्लीच्या टोकावर,

जराशी रहदारी कमी झाल्यावर

मी नेहमीच ज्या रस्त्याने जातो

तेथे उभा होता एक भला दांडगा कुत्रा

अक्राळ विक्राळ,

रक्ताळलेले डोळे आणि

तीक्ष्ण सुळ्यांची भीती दाखवत

जीव घेणी गुरगुर करत.


मी थबकलो, बावरलो, घाबरलो

क्षणभर म्हटलं संपलंच सारं,

समोर गुरगुरणाऱ्या कुत्र्यांची फौज

आणि प्रत्येकाच्या जबड्यात एक एक लेग पीस

माझ्या रक्ताने माखलेला,


अर्रर्र!!!

हे तेच पिल्लू होतं,

काही दिवसांपूर्वी जे एका तुकड्यासाठी

माझ्यासमोर गोंडा घोळत होतं.

कुई कुई करत माझी मनधरणी करत होतं

आधीच पेकाटात लाथ घातली असती तर

ते इतकं शिरजोर झालंच नसतं.


'आसमान में भी सुराख हो सकता है

एक पत्थर तो तबियत से उठा लो यारो'


मला आभाळाला भोक पाडायचं नव्हतं

कुत्रं पळालं तरी खूप.

हिम्मत करून भिरकावला एक दगड

कुतारडं पळालं मरणाच्या भीतीने,

गुरगुरत राहिलं गल्लीच्या दुसऱ्या टोकाहून.


आता मी बिनदिक्कतपणे रोज त्याच रस्त्याने जातो

कुत्रं माझ्या वाऱ्यालाही उभं राहत नाही.




Rate this content
Log in