STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

5.0  

Sonali Butley-bansal

Others

कुंपणात अडकले शब्द...

कुंपणात अडकले शब्द...

1 min
4.2K


कोसळला भरगच्च शब्दांचा पाउस,

चिंब भिजले मी

काही ओघळले, निथळले, वाहून गेले

दूरवर...

काही आडोशाला गेले. ..

काही कुंपणात अडकले दूरवर पहात. ...


मी हात पसरले वचन दिले त्यांना

नाही दुखावणार कुणी तुम्हाला शब्दानेही

ते म्हणाले तुझे वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, परंतु इतरांचे काय?


त्यांनी उंच जावे अन् आभाळभर व्हावे हेच माझे स्वप्न

तेव्हा ते म्हणाले , आम्हीच तर पाउस झालो अन् बरसलो ...


मी स्तब्ध !!!


कोणत्या भावनेत हे तप्त होउन आभाळी गेले अन् कोणत्या भावनेच्या थंडाव्याने

पाउस होउन बरसले?


Rate this content
Log in