STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

कुणास ठाऊक हे प्रेम

कुणास ठाऊक हे प्रेम

1 min
11.8K


कुणास ठाऊक हे प्रेम

असे कसे चुकले

जायचे होते दूर

तर मने का जुळले

बदलल्या जेव्हा वाटा

आसवांचा निरोप का घेतला


कुणास ठाऊक हे प्रेम

असे कसे चुकले

येता गोड आठवण 

एकटीच का हसत राहिले

बेधुंद होऊन बागडताना

डोळ्यात अश्रु का पाझरले


कुणास ठाऊक हे प्रेम

असे कसे चुकले

अचानक येता समोर

क्षणभर बावरून का गेले

असते बोलायचे खूप काही

नकळत अनोळखी का झाले


कुणास ठाऊक हे प्रेम

असे कसे चुकले

जपूनी भावना प्रेमाची

आनंदी का भासले

होते एकच मन आपले

पण दूरवर आयुष्यभर का

ते मन झुरले का मन झुरले..............


Rate this content
Log in