STORYMIRROR

Meena Kilawat

Others

2  

Meena Kilawat

Others

क्षणागणिक

क्षणागणिक

1 min
13.9K


क्षणागणिक ते सावरतांना

चाहूल होतं असते मनाला

जर का जगी आरसा नसता

मुकले असतो का? तारुण्याला.....

पाहात असता फोटो आपले

मनातच ती कळवळली

तारुण्यातली रसरसनारी

सुरेख कांती कुठे हरवली....

सळसळनारी डौलदार

चाल पाहुनी मागे किती

सांगु कशी मी एकेकाची

तीरा परी नजर निती.......

किती भरभर दिस जातात

काही कळत पण नाही

तरुण पन शापित असत

काळ काही थांबत नाही......

आठवले ते जुने दिवस

की मन नाराज होतय

चिरतरुण का कोणी झाले

फक्त नटी ही तरुन दिसतेय.....

तारुण्य अबाधित नसतय ग

यायला हवा ना मोठेपणा

बोल बोबडे ते ऐकाण्यासाठी

नातवात मन असतेच ना.......


Rate this content
Log in