क्षितीज एक आभास
क्षितीज एक आभास




असे एक आभास क्षितीज,
तरीही वाटे किती हवेहवेसे,
रोज नवी स्वप्ने, नव्या आशा,
जगणेही वाटे मग नवेनवेसे
मृगजळापरि ती भासे सदासर्वदा,
उगाचच वाढते पाहून मनाची हूरहूर,
जमीन, आकाशाची मिलनरेषा क्षितीज,
रेषा जवळ जावे तशी जाते दूर दूर
दूर असलेल्या त्या क्षितीजावरती,
सुंदर सुखांना आपण सारे शोधूया,
घेण्या उंच उंच भरारी गगनात,
स्वप्नांचे इमले (बंगले) बांधूया
धरणीला आकाश टेकल्याचा भास,
तेच क्षितीज पाहण्याचा अट्टाहास,
जीवनाच्या खडतर अशा प्रवासात,
यशाचे शिखर गाठण्याचा ठेवू ध्यास