कसे कळते शब्दांना
कसे कळते शब्दांना




(अष्टाक्षरी रचना)
कसे कळते शब्दांना
भाव माझे मनातले
शब्द येती ओठावरी
दडलेले दुःखातले
काव्य मी रचिते माझे
शब्द शब्द ते मिळुनी
होते सुंदर कविता
गाते मी सूर लावुनी
संगिताने सजवते
गोड सूर गळ्यातुनी
उमटती शब्द माझे
मन जाते आनंदुनी
बघा किमया शब्दांची
भाव माझे ते सांगती
ताल सुरांनी ते सदा
लोकां कायम स्मरती