STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

कसे कळावे?

कसे कळावे?

1 min
13.8K


हे ही थोर आहे, ते ही थोर आहे 

कसे कळावे कोण साव नि कोण चोर  ?

यांच्यातले चो , त्यांच्यात थोर झाले 

कसे कळावे कावळ्यांचे कसे बगळे झाले ?

पोशिंदा पोरका झाला, भामटा कारभारी झाला 

सत्यावर करून कुरघोडी,असत्याची बांधली माडी

नेता संधीसाधू , प्रशासक मुजोर, बेकार पोटासाठो दिशादाही

घालमेल लोकशाहीच्या राजाची समजून घेणार की नाही?  

खऱ्याच खोटं, खोट्याच खरं,लबाडाचं तोंड मोठं 

कशाला कुणी सांगावं, हे काय आम्हास माहित नाही?

 बोलू नकोस तू भलेही, कळले आम्हा सर्वकाही 

विठोबा रडतो पिठासाठी बाकी काही नाही

भरती - ओहोटी, पुन्हा भरती येणारच ही सागरा 

समूजन कुणी घ्यावी वादळापूर्वीची स्मशानशांतता?

जाईलही वैशाख वनवा  पुन्हा नव्याने येईलच की,

बहर वसंताचा नवचेतना जागविण्या तंना मना  


Rate this content
Log in