STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

करुया कोरोनावर मात

करुया कोरोनावर मात

1 min
798


एक विषाणू असा पसरला

नाव त्याचे कोरोना

चित्र बदलले सा-या सृष्टिचे

क्षणात कसे बघाना


धावत होती वायूवेगाने

शहरे गजबजलेली

पंख तयांचे छाटले जणू

सारी हतबल झाली


रस्ता सारा सुना जाहला

दहशत राक्षसाने माजवली

गरीब श्रीमंत सारी माणसे

घरात आज कोंडली


जो तो पाही संशयाने

एकमेकांकडे असा

माणूस नव्हे पुढे उभा जणू

काळ ठाकला आपुला जसा


वाट विसरली होती गावाची

आज रस्ता तो धरला

सुरूकुतलेला चेहरा आज

खूप दिवसानं हसला


पैशांसाठी धावणाऱ्यांना

किंमत जिवाची कळली

सारी माणसे एका छताखाली

खूप दिवसानं जमली


जाईल संकट हेही टळुनी

घरात बसूनी करुया मात

आज पाऊले घरात थांबवा

तरच घ्याल श्वास जगात


Rate this content
Log in