कृतज्ञता
कृतज्ञता


आज बैलपोळा सण माझ्या ढवळ्याचा
न्हाऊ माखू घालून त्याचे करू पुजन
शिंगे रंगवुनी फुल अन् घंटा माळा गळ्यात
आरती उतारून खाऊ घालू त्यास पुरण.
वाजत गाजत काढायची त्याची मिरवणूक
आनंदी आनंद पोरां-थोरां साऱ्या गावात
हा एकच दिन माझ्या ढवळ्याचा आरामाचा
माझ्या संगे राबतो सदैव,मी त्याच्या ऋणात.
आज दावी मी कृतज्ञता मुक्या माझ्या मित्रा
तुझ्याच जिवावर कष्ट उपसतो मी शिवारात
तुझे माझे जगणे हे ह्या शेतातल्या धान्यावर
धान्या पिकून येणे मात्र ते देवाच्या हातात.
सण बैल पोळा करून होतो थोडा उतराई
तुझ्या उपकारांचे ओझे असे माझ्यावरी
आज माझ्या सर्जाचे आभार मी मानतो
तुझे ऋण राजा रे सदैव माझ्या शिरावरी.