कृतज्ञता
कृतज्ञता
1 min
272
भावफुलांची भरुनी ओंजळ,
कृतज्ञतेने माथा झुकवून,
शब्दफुलांची गुंफून माळ,
आभाराची करी पखरण!!
विश्वासाचे मज देऊन बळ,
अचूक केलेत मार्गदर्शन,
सहवास लाभे तुमचा प्रेमळ,
सुलभ होई कार्य कठीण!!
विश्वास आपला होईल सार्थ,
कर जोडोनी करते याचन,
शुभशीष तुमचे जाई न व्यर्थ,
सदैव राहो मजवर ध्यान !!
