कृपाशीर्वाद
कृपाशीर्वाद
1 min
346
बसली माझी भवानी
सदैव रक्षण ती करी
पुरवती सामर्थ्य समर्थ
रेड्या मुखी वेद वदवी
लेखणीचे शस्त्र हाती
दिले त्या सरस्वतीने
कृपाशीर्वादाने तिच्या
चालते माझी लेखणी
शब्दरत्नांचे धन
पुरवतो तो गजानन
उपासनेने त्याच्या
शुद्ध होई अंतःकरण
थोरामोठ्यांचे आशिर्वाद
पाठीशी सदैव माझ्या
महादेवाचे रक्षा कवच
सतत सोबत माझ्या