STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

कृपा तुझी...!

कृपा तुझी...!

1 min
758


कापले जरी पंख माझे

मी हार मानणार नाही

गगनभरारी घेतल्याविन

मी राहणार नाही.....


उर्मी आतल्या जीवाची

थंड मज बसू देणार नाही

ज्वाला मुखी संतप्त तो

उसळल्याविन रहाणार नाही....


आता सहनशीलतेचा देवा

कहर झाला असावे मज वाटते

तरीही त्यातूनही वेडे मन माझे

अजूनही योग्य वेळेची वाट पहाते....


तो क्षण ती वेळ मज आता

घडोघडी सारखी खुणावते

पुन्हा पंख फुटल्याची जाण

झेप घेण्यास दिशा दावते....


वाघाची धाड माझी

सिंहाची निधडी छाती

गरुडाचे पंख बलशाली

झेपावण्यास विस्पारती....


घेईन भरारी उंच आकाशी

गवसणी घालण्या ध्येयास माझ्या

थक्क होतील सारे पुन्हा

पाहुनी कृपेस देवा तुझ्या....!!!!"



Rate this content
Log in