कर्ज
कर्ज
1 min
41.7K
किती प्रकारचे कर्ज
माणसाच्या डोईवर
सांभाळतो आनंदाने
माणूस हा जन्मभर
कोण सांभाळतो त्याला
कोण उठवी सकाळी
त्याचे कर्ज आठवत
नाही त्याला कधी काळी
मोठा लहानाचा झाला
कोणी उपकार केले
खाणे नव्हते माहीत
कुणीतरी शिकवले
पशू, पक्षी, वृक्ष, वेली,
हवा, पाणी, देव देतो
कर्ज कृपाळू प्रभूचे
असे कसे विसरतो
नऊ मास वागविले
उदरात ज्या मातेने
दूध पाजूनि आईने
केले जतन कष्टाने
बाप राबला शेतात
शेत घामाने भिजले
घास मिळावण्यासाठी
अन्नधान्य पिकवले
कुणी प्रेम दिले इथे
राग लोभही साहिले
कर्ज तुमच्या प्रेमाचे
माझ्या डोईवर झाले
