Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Others

4.0  

Rakesh More

Others

कोविड - 19

कोविड - 19

1 min
11.6K


अंतर वाढलंय मनामनातलं 

व्यक्ती व्यक्तीचं 

म्हणूनच दुराव्याचं चक्र केलंय 

त्यानं इतकं सक्तीचं ||0||


कदाचित माणसाला माणसाची 

किंमत कळावी 

माणसामाणसातील द्वेषाची 

भिंत गळावी 

महत्त्व कधीतरी कळावं 

त्याला विरक्तीचं 

म्हणूनच दुराव्याचं चक्र केलंय 

त्यानं इतकं सक्तीचं ||1||


कोणावाचून खरंच काही 

अडतंय का 

दुराव्यातही मन कोणावर 

जडतंय का 

सुख मिळतंय का खरंच 

त्याला आसक्तीचं 

म्हणूनच दुराव्याचं चक्र केलंय 

त्यानं इतकं सक्तीचं ||2||


काही नाती या काळात 

तुटूनही जातील 

टिकून राहतील काही नाती 

काळजाच्या आतील 

मोल कळावं माणसाला 

प्रेमभक्तीचं 

म्हणूनच दुराव्याचं चक्र केलंय 

त्यानं इतकं सक्तीचं ||3||


प्रेमात दुरावा जरुरी असतो 

कधी तरी 

व्यवस्था तर तीच दिसतेय 

निर्मिकाची भूवरी 

प्रदर्शन केलंय त्यानं आपल्या 

अफाट शक्तीचं 

म्हणूनच दुराव्याचं चक्र केलंय 

त्यानं इतकं सक्तीचं ||4||


Rate this content
Log in