कोरोनाने दिला धडा
कोरोनाने दिला धडा
1 min
821
शत्रू आहे कोरोना
पण धडा दिलाय चांगला
कुटुंबापासून दूर जाणारा
आज घरातच थांबला
नाती जवळ आली
वर्षांपासून दुरावलेली
शहरातल्या माणसांनाही
गावाची आज किंमत कळली
खेळ पूर्वीचे सारे
घरात आज रंगले
लहान मोठे सारेजण
गप्पांमध्ये दंगले
रोज धूर सोडणा-या
गाड्या आज थांबल्या
प्रदूषण सारे रोखून
वाटा मोकळया झाल्या
जातीभेद विसरुन
देश एकत्र आला
सर्वांच्या कल्याणासाठी
घरोघरी घंटानाद झाला
पैसा, अडका, जमीन, जुमला
कवडीमोल सारे आहे
शरीरातील श्वासच फक्त
आज अनमोल आहे
