STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

कोरोना..

कोरोना..

1 min
60

कोरोना पसरत नाही

तो पसरविला जातोय,

माणूसच माणसाचा

उगीच जीव घेतोय


कोरोना पसरविला

दिल्लीतून गल्लीत,

माकडाच्या हाती

जणू दिलंय कोलीत


कोरोनाचा का पसरवणाऱ्याचा

करावा बंदोबस्त,

श्वास झाला बंद

जनता सारी त्रस्त


शासन करतंय बिचारं

सर्वतोपरी उपाय,

खेकडावृत्ती बळावतेय

धरुन ओढते पाय


शून्याचा कोरोना आकडा

गेला हजारोंच्या घरात,

झाला नाही फायदा

वाजवून ही परात...


सगळीकडे झाला या

कोरोनाचा हाहाकार,

जनता बसली बघत

करतंय काय सरकार...


बंद काय, चालू काय

काहीच नाही मेळ,

दिल्लीत झाला खेळ

वाईट आली वेळ...


अजून थोडा वेळ आहे

उशीरा लक्षात येईल,

कोरोना पसरवणारे संपले

तरच कोरोना संपून जाईल..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन