कोल्हापूर....!!
कोल्हापूर....!!
हौस भारी आपल्या
बोली भाषेची
म्हणे फशिव गंडीव
बोलून जरा दाखीव..!!
भाऊ हे कोल्हापूर हाय
इथं काय बी पिकतं
आणि भावा
इथं काय बी विकत..
इथला
कायदाच वेगळा
म्हणशील तू
जगा वेगळा...
पण गड्या
फशिव गंडीव
शिवाय इथं
काय बी चालत नाय...
तरी पण सांगतु
इथं खोटं नाटं बी
कधीच खपवून
घेतलं जातं नाय....
जे बी करायचं ते
बिनधोक करायचं
मुळू मुळू इथं
रडत नाही बसायचं...
भावा मदतीला
पासरीभर गोळा होत्यात
केंव्हा बी कसा बी
राडा घालत्यात....
वाटलं तर रातीला
बोलवाय येत्यात
माफी बी मागून
पुन्हा गड्या भावा म्हणत्यात....
म्हणून तर इथं
गंडीव फशिव चालत
आणि गुण्या गोविंदान
जीवन बेस पळत....!!!!
