कन्या अभिमान दिन..!
कन्या अभिमान दिन..!
करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम
न्यायिक इच्छापूर्तीसाठी त्याची प्रार्थना
अविरत आपण करत आलो
भीक मागण्याची सवयच जणू
मान खाली घालून जपत आलो
नकळत साऱ्या गोष्टी घडतात
दिवसाढवळ्या जबाबदाऱ्या येतात
नकारात्मकतेच्या मानसिकतेवर तगतात
त्यातलाच कन्या प्राप्तीचा योग
आपण दुर्भाग्य मानून स्वीकारतो
आणि घरच्या लक्ष्मीचा अवमान करतो
सत्य खरेच नेहमी कटू असत
मुलीच्या बापाला ते चांगलं कळत
ते परक्याच धन म्हणून सांभाळताना
त्याच काळीज नित्य जळत
जेव्हा ते धन स्वाधीन करण्याची वेळ येते
तेव्हा लक्ष्मीच जाणंं असह्य होत
पण तिच्या मांगल्य पूर्ण आशीर्वादात
सार घरदार न्हाऊन निघत
तेव्हा कन्येच खरंं मोल कळत
फक्त बापाचं उर मग अभिमानान फुलून येत
आणि सार जीवनातील
दुःख दैन्य दारिद्र्य निघून जात
सौख्य समाधान शांतीचं
तिच्यामुळे फुलेल नंदनवन
सदैव अबाधित राहत
म्हणून बापाला कन्येचा
सदैव अभिमान वाटतो
त्याच्या साठी प्रत्येक दिन हा
कन्या अभिमान दिन असतो
कन्या अभिमान दिन असतो.....!!!
