कित्ता...!!
कित्ता...!!
आमच्या लहान पणी
कित्ता गिरवणे प्रकार होता
त्यामुळे अक्षर सुबक व्हायची
स्मरणशक्ती वाढायची लिखाण छान व्हायचं
वळण लागणे म्हणजे काय
तेव्हा कळायचं नाही
पण गुरुजी सांगायचे
अक्षरं वळणदार आली पाहिजेत
इतक्या वर्षांनंतर वळण लावणे
म्हणजे काय आता कळत
स्वतःला वळण लागल की
बाकीचे आपोआप वळणावर येतात
आणि जेव्हापासून मी
वळणदार शब्दाचा अर्थ
आत्मसात करीत गेलो
तेव्हापासून माझा पंथ वाढत गेला
प्रत्येकाला आता मागे वळून
पहायला वेळ मिळू लागला
काहीतरी लिहावं वाचावं वाटू लागलं
बरं मलाही वाटलं, जेव्हा त्याच दर्शन घडलं
आता लेखणी बरीच अनेकांची
सृजनशील झाल्याचे जाणवते
तेव्हा मला माझ्या प्रयत्नाची
नकळत पोच पावती मिळते
खरंच आपल्या डोळ्यातलं कुसळ
आपल्या आपण काढतो आणि
दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ सुद्धा
दिसेनास होत तेव्हा खरंच स्वर्ग सुख मिळत
...खरंच स्वर्ग सुख मिळत....!!!
