किती पदर मायेचे!!
किती पदर मायेचे!!
1 min
177
मायेचा पदर
जन्मतःच मिळे
ऊर माऊलीचा
वात्सल्य निथळे (१)
मायेचा पदर
बहीण धाकटी
भारी पितांबर
भाऊरायासाठी (२)
मायेचा पदर
शेजीबाई देते
अडल्या वेळेला
मदतीस येते (३)
मायेचा पदर
सासूबाई देई
सांभाळी सूनेला
लेक समजूनी (४)
मायेचा पदर
लेक मायबापा
आधार तयांना
देई प्रेम माया (५)
मायेचा पदर
देवीमाता धरे
संकटात येते
धावूनिया त्वर
