STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

किर्रर्र रात...!

किर्रर्र रात...!

1 min
14.6K


किर्रर्र राती काजव्यांची

दाटी वनी मी पाहिली

तुझ्या आठवणीस सखे

पहिली आदरांजली मी वाहिली...!


डोईवरी चंद्र द्वाड

हसत गालात होता

त्याला मोठाच हेवा

कदाचित वाटत होता...!


पूनव नव्हती तरी

तोरा वेडे दावत होता

म्हटले थांब जरा

तुझा भास होत होता...!


दिसलीस वळणावर

चांदण्या रात्रीत मला

चंद्र वेडे ढगाआड झाला

लाजूनी पाहता तुला..!


त्याच क्षणी पटले मला

वेडा मी नाही तोच आहे

सौंदर्याची त्यास काय जाण

डागाळले रूप घेऊनी झाला पसार..!


आलिंगता काजवेही निमाले

बांधले त्यांनीही प्रेमाचे बंगले

अंधारलेल्या त्या क्षणी

लख्ख तेज तुझे गं मी पाहिले..!


किर्रर्र रात ती रात किड्यांची

आजही मज आठवते

काजवा पाहुनी उरी सखे

डोळा पाणी साठवते....!!!


Rate this content
Log in