किनारा..
किनारा..

1 min

12K
ती रानभैरी
मी सोसाट्याचा वारा
ना तिला किनारा
ना मज कुठे निवारा..
ती झुळूक हवेची
मी झोत बोचरा
ती कुपी सुगंधी
मी रान मोगरा..
तिला पाहिले जरासे
अंगी शहारा शहारा
वीज वळीवास भेटली
कोसळती धारा धारा..
मुंडावळ्या झाल्या वेली
डहाळी बाशिंग वर तुरा..
तिला माझा किनारा अन्
मज हक्काचा ती निवारा..