किमया
किमया
फसलो मी पुरता जादु केली तुझ्या नजरेने
बांध घालु किती मला वळलो तुझ्याच रस्त्याने
किमया पहिल्या प्रेमाची जादु कोवळ्या वयाची
जादु झाली ओझरत्या स्पर्शाने
हरलो प्रिये प्रेमाच्या गोड अनुभुतीने
कधी मला मीच बिलगतो तुला आठवतो
दचकतो पाहिल कोणी नजर चोरतो
राञं दिनी तुला क्षणोक्षणी न्याहाळतो
अायुष्य तु माझे दिलेस जे मी ही जपले
श्वास तुझे उधार उसने मला अजुन हवेहवे
स्पंदने उठती ह्दयांत स्पर्श तनु ही मनी मखमले
हळुवार पहिले गहिरे खोल प्रेम हे नवेनवे
मला न समजे किमया जादु प्रेमाची हसली कळी उमलली नवतारुण्याची
भिजलं मन चिबं चिंब ओसंडुन वाहे
सांग सखे नजरानजर होते तेव्हा मी माझा न राहे
अबोल प्रित हंदयी दरवळते गंधाळुन गेली कळीं फुल उमलते
