खुर्चीचे डोहाळे
खुर्चीचे डोहाळे
1 min
1.0K
बाळाची खुर्ची
खूपच लोभस
दादाची खुर्ची
शांत व सालस
बाबांचा तर
दिमाखच न्यारा
त्या खुर्चीचा
असतो भारी तोरा
सगळ्यांनाच असते
खुर्चीची हाव
ती मिळाल्यावर
खातात भाव
खुर्चीवर बसताच
डोहाळे लागते
दूध - मलाई
खावीशी वाटते
खुर्चीचे डोहाळे
बंद करू या
भ्रष्टाचाराला
आळा घालू या