STORYMIRROR

Kiran Ghatge

Others

4  

Kiran Ghatge

Others

खुप झाली तुझी मर्जी

खुप झाली तुझी मर्जी

1 min
118

बस कर आता खुप झाली तुझी मर्जी

आभाळात तुझी रोजच होते गर्दी.

बरस आता एकदाचा दे तुझी वर्दी. 

होऊ दे ना आम्हाला सुद्धा तुझ्या 

अस्तित्वाची पुष्टी.


खूपच वाढत चालली तुझी मस्ती

विसरलास आता तू निसर्गाची दोस्ती

सूर्यही तापला इथं आगीवाणी

तु मात्र बसलास फुगवून आपली छाती


शिंपडू नकोस चेष्टेने आमच्यावर पाणी

अश्रूही गोठलेत गाऊन तुझी रडगाणी

बस कर तुझी आता मनमानी 

कुठं कुठं जाऊ पाण्यासाठी अनवाणी


बस झाला तुझा आता लपंडाव

किती घालशील जगण्यावर घाव

खेळ आता तू अंतिम डाव

ओसंडून आता जोरात धाव

पाहून तुला सारेच म्हणतील 

आनंदाने.....!!!


पाऊस आला 

पाऊस आला 

वाव !!!



Rate this content
Log in