Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

खरंच सलाम !..

खरंच सलाम !..

1 min
14.5K


सलाम !

तुमच्या सहनशीलतेला

मुजोर बदनाम वर्दीला  

डागाळलेल्या खादीला

सलाम !

पांढरपेशा वृत्तीला

वासनांध श्वापदांना

मरणास टपलेल्या गिधाडांना

सलाम !

भीषण नाट्य घडविणाऱ्याना

केवळ बघ्याची भूमिका घेणा-याना

किडया मुंग्यांप्रमाणे जगणा-याना ...

सलाम !

तुमच्या संधीसाधू बेरकीपणा

लोकशाही भासवनाऱ्या ठोकशाहीला

तुमच्या संधीसाधू बेरकी निर्लज्जपणाला

सलाम !

योजनांचे तीनतेरा वाजविणाऱ्याना

लाल फितीत सरकारी धोरण कुजविणाऱ्याना

विकासाच्या नौटंकीला , त्यांच्या पापात सहभागी प्रत्येकाला 

सलाम !

गप्प गुमान दुःख भोगणाऱ्या मानसिकतेला , अगतिकतेला

संकटातही न ढळणाऱ्या अजोड आत्मविश्वासाला

खरंच सलाम तुमच्या भोगण्याला आणि जगण्याला ...


Rate this content
Log in