STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

2  

.प्रमोद घाटोळ

Others

खरा धर्म

खरा धर्म

1 min
1.0K


विजयाने उन्मादू नये अन् पराभवाने खचू नये

झऱ्यासारखे निवांत वाहवे, उगाच धडधड वाजू नये


अनेक सम्राट आले गेले, जीर्ण झाले किती मळे

जीवनगाणे असेच असते, सूर संपता कोण रडे?


आज आहे उद्या नसतील, सवड काढूनी भेट कुणा

दोन शब्दं प्रेमाचे बोलूनी, माणूसकीच्या ठेवं खुणां !!


रंग कुणाचा पसंत नसता, थांबणे आपुले जरा बरे

घोर निराशा पसरुनी त्याशी, देऊ नये हृदयात चिरे


करं कुणाचे उगाच अडवूनी, सांग कुणाचे झाले बरे ?

अनीत दुजाचे आपण करता, आपुले का पोट भरे ?


आशा असते उरात ज्याच्या, स्वप्न तयाचे होते खरे !!

संकटतही मार्ग सापडे, काटयावरही फुल धरे !!


गरजेपुरते घे आपुले, दुसऱ्यासाठी ठेव जरा

कुठंवर मोजशी पापपुण्य रे, माणूसकीचा धर्म खरा !!!


Rate this content
Log in