खरा दागिना
खरा दागिना
आरोग्याची ही गुरुकिल्ली
नित्य नेम व्यायाम करा
शरीर सामर्थ्याने अवघ्या
रोगांना प्रतिकार करा
शैशव, यौवन, आणि प्रौढता
वृद्धपणा ह्या चार अवस्था
धन शरीराचे आरोग्य असे
नित्य तुम्ही जपणूक करा ***1.
शरीर निरोगी खरा दागिना
सुख संपत्ती फोल त्याविना
आरोग्याची नियमिततेवर
या शरीराची असे धुरा***2.
प्रथम पाहिजे शरीर संपदा.
पदोपदी येतील आपदा.
द्याया टक्कर त्या विपदासी.
शरीराला मजबुत करा***3.
देह हळू हळू झिजत राहतो.
रोज कष्टता थकुनी जातो.
नीज शक्तीचा प्रपात होतो
थांबविण्याचा यत्न करा ***4.
योगासन वा प्राणायाम.
मन, देहाला मिले आराम.
ओंकाराची ध्यान धारणा
मनासही विकसित करा ***5.
सहनशक्ती वाढली पाहिजे.
प्रतिकाराचे बळ ही लाहिजे.
घरात चला, पायी फिरा
हा तर सोपा मार्ग अनुसरा ***6.
रोज शरीर जमेल तितका.
वृद्ध पणाला सोसे इतका.
कुडीस ठेऊ नका लाडवून
घाम गळू दे रोज जरा ***7.