खेळ
खेळ
1 min
41.7K
कसा मांडला नि:शब्द,
खेळ इथे नियतीने.
दुष्ट चक्रव्यूहासंगे,
फिरे गृह भोवतीने..
गेली घडी विस्कटून,
स्तब्ध झाले हे जगणे.
नाही राखले जीवनी,
काही शिल्लक मागणे..
उधळले रंग सारे,
बेरंगीच जिणे झाले.
गोड गुलाबी स्वप्नांना,
क्षणार्धात तडे गेले..
राख रांगेळी होऊनी,
वर्मावर घाव झाले.
खचलेल्या मना कुणी,
नाही सावरण्या आले..
काय असा होता गुन्हा,
दु:ख माझ्या वाट्या यावे.
विश्वासाचा घात होण्या,
घरचेच भेदी व्हावे..
