खेळ
खेळ
एका ईश्र्वर प्राप्तीसाठी
मानवाने रचले अनेक खेळ
ईश्वर प्रसादरुपी सुखासाठी
विविध ग्रंथांचा जमवी मेळ
ऐक छत एक ठिकाणा
हिच मानवा तुझी ओळख
चंद्र सूर्याच्या साक्षीला
धर्मावरुन लावतो पाळख
अनेक नावाचा हा निर्मीक
नीरविकारी रुप अनंत
याच्या गुणाच्या महतीचे
गुण गातात धर्मा धर्माचे संत
त्या शक्तीने नाही केला
माणसा माणसात भेद
तरी लाल रक्त झगळतांना
पाहून त्याला होतो मनात खेद
जरी पेहराव व चालीरीती
कागदी पुस्तकातील ज्ञान
कितीही असतील फरक
तरी माणूसकीचा राखावं मान
ऐका छत्रछायेत असता
ऐकतेनं जोपासावा बंधूप्रेम
या धरतीवरील मैदानात
खेळावं सहिष्णू मानवी प्रेम
