खेळ औटघटकेचा
खेळ औटघटकेचा
1 min
26.4K
हे जीवन म्हणजे खेळ औट घटकेचा
रे वेड्या माणसा समजून घे तू जरासा
रे असे बालपण, सकाळ तव जीवनाची
आई जवळ बसून घेई मजा तू तयाची
असे धमक तुझ्यामध्ये काही करण्याची
ही दुबार संधी तू कमाई करी जीवनाची
आली जवळ संध्याकाळ तव जीवनाची
किती करशील घाई नाही कामी यायची
बॉल सुखदुःखाचे येतील तुझ्या समोर
घे समजून त्यांना मार षटकार चौकार
नाबाद रहा, मिळाले आयुष्य हे जोवर
धावा सद्गुणांच्या मिळवाव्या हो भरपूर
