खेकडा
खेकडा


सिगारेट ती अर्धी जळाली,
पूर्ण जीवना आग लागली
सुख स्वप्नं ती राख जाहली,
देह जाळला कवटी उरली (१)
विडी, सिगारेट सतत ओढतो,
खेकड्यास त्या तो आवडतो
असे खेकडा,चाल वाकडी,
नकळे केव्हा गळा आवळतो (२)
कर्करोग होताच निदान,
शरीर झिजते शोषित प्राण
उपाय केले किती तरीही
मिळे न कोणाही जीवदान (३)
धुम्रपान की मद्यपान
बा सोडा सारे निर्व्यसनी व्हा
नका खेकडा जवळ करू
जीव निरोगी अमोल ठेवा (४)
घेऊ नका रे मरण ओढुनी,
व्यसन मृत्यूची पायाभरणी
अखेरची ही विनंती ना तर पोटी
घेईल धरणी (५)
टळले आहे मरण कुणाला,
जो जो या धरणीवर आला
जर्जर व्याधी नकोत अंती आनंदाने
कवळ मृत्यूला (६)