खारूताई
खारूताई
1 min
1.0K
इटुकली,पिटुकली खारूताई धिटुकली
सरसर चढते झाडावर ,भरभर येते खाली।
मऊ, मऊ अंग स्पर्श दुलईच छान
झुबकेदार शेपटीने झाडते रान।
भिरभिर नजरेची जादूच भारी
खारूताईच्या प्रेमात सान थोर सारी।
शेंगाची टरफले सोलते कड्कडम्
चटकन दाणे खाते गुट्गुटम।
टुकटुक न्याहाळून पाहतच राहते
छोटुकली खारूताई मला फार आवडते।
खारूताई माझी असे मैत्रिण खास
द्यायचा नाही बरं का, तिला कुणी त्रास ।
अकडम् पकडम् गप्पा मारते तिच्याशी
ऐकून आई म्हणाली, काय बोलते खारूशी।
